फिजीओथेरपीमध्ये मॅट्रीक्स रिदम थेरपीने केली क्रांती -डॉ.निखील केंद्रेकर

 

मॅट्रीक्स रिदम थेरपी ही फिजीओथेरपी व पूनर्वसन क्षेत्रातील एक अत्यंत नवीन उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीचा शोध जर्मनी येथिल 'एरलॅंगन विद्यापिठामध्ये २००० सालात लागला.
मॅट्रीक्स या शब्दाचा अर्थ शरीरातील पेशी व बाह्यद्रव. या पेशी व बाह्यद्रवावर झालेल्या संशोधनाअंती असे लक्षात आले की, निरोगी शरीराच्या पेशींमध्ये विशीष्ट प्रकारचे ''कंपन'' किंवा ''रिदम'' असतात आणि हे ''कंपन'' रोगट शरीरात मंदावतात, त्याचा परिणाम आजार लवकर बरा होत नाही व जूनाट दुखणे, संवेदना मंदावणे, रक्ताभिसरणातील त्रुटी, जखम लवकर न भरणे इ.लक्षणे संभवतात.
या ''रिदम''ला पुर्ववत करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 'मॅट्रीक्स मोबील' या उपकरणाची निर्मीती केली.
'एरलॅंगन' विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत सतत सात वर्ष विविध रुग्णांवर झालेल्या वापरानंतर, उपकरण फिजीओथेरपी वापरासाठी खूले करण्यात आले.
उपकरण शरीराच्या भागांवरुन फिरवले जाते, त्याचा फायदा रुग्णास लगेच् जाणवू लागतो. उपकरण बाह्यभागांवरच् फिरवायचे असते. पेशिंचे कंपन अतीसुक्ष्म स्तरांवर पूर्वस्थितीत येतात आणि लक्षणे दृष्य स्वरूपात कमी होतांना दिसतात. जसे: तिन ते चार वेळेसच्या वापरानंतर खांदा दुखणे कमी वाटते तसेच मधुमेहातील न भरणार्या जखमा बरया होम बसजंजं रूग्णांस जाणवते.
'मॅट्रीक्स मोबील' कोणत्या आजारांवर वापरतात?
आपले शरीर हे पेशीसमुहानेच बनले आहे. म्हणजेच् प्रत्येक आजारामध्ये हे उपकरण वापरता येते आणि त्याचे फायदे सिद्ध झाले आहेत.
उपकरण वापरल्यानंतर भरपूर पाणी पिणे, सांगितलेले व्यायाम करणे तसेच आवश्यक ते औषधोपचार घेणे आवश्यक आहे. ज्या आजारांत उपकरण वापरता येते ते खालीलप्रमाणे.
:- मधुमेहातील न्युरोपॅथी म्हणजेच मज्जावकारांत हात-पाय दुखणे, मुंग्या येणे, संवेदना मंदावणे इ. लक्षणे दिसतात. मॅट्रीक्स बरोबरच ब जिवनसत्वाच्या वापराने हा िवकार बरा करता येतो.
:- मधुमेह, धुम्रपान किंवा सतत झोपून असलेल्या रुग्णांना जखम लवकर बरी न होण्याचे त्रास होतात, मॅट्रीक्सच्या वापराने पेशींमधील कंपन पूर्ववत होऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत होते व जखमा भरू लागतात.
:- खांदा आखडणे/दुखणे, टेनीस एल्बो, टाच दुखणे, गुडघे दुखणे अश्या जूनाट अाजारांत, उपकरणाच्या वापराने स्नायु सैल होतात. त्याबरोबर व्यायाम केल्यास स्नायुंची शक्ती वाढुन त्रास बरा करता येतो.
:- पार्कीनसन, जि.बी.एस., अंकीलोसिग स्पॉंडीलोसीस अश्या आजारांत रुग्णांचे दुखणे व आखडणे कमी होऊन हलचाल वाढवता येऊ लागली आहे.
:- लहान मुलांतील व्यंग जसे, मुल पंजावर चालणे, पोलीओ इ.मध्ये उपकरणाच्या वापराने स्नायु सैल करता येतो व शस्त्रिक्रयेचा सहभाग कमी करता येऊ लागला आहे.
:- काहींना अपघातानंतर नर्व्ह म्हणजेच मज्जातंतुला इजा पोहोचते व त्या भागात मुंग्या येणे-सुन्न/बधिर पडणे त्या भागाची हलचाल न करता येणे अशी लक्षणे िदसतात. बी ६ , बी १२ या जिवनसत्वाबरोबर मॅट्रीक्स ५ ते ६ वेळेस दिल्याने तसेच पाठोपाठ व्यायाम केल्याने शस्त्रक्रिया टाळता येते.
:- मणक्यातील विकार, ऑस्टीओपोरोसीस म्हणजेच हाडाची ठिसुळता अश्या आजारांत मणक्याच्या बाजुने उपकरण फिरवल्याने हाडाच्या पेशींचे कंपन पूर्ववत हाेतात. त्याचबराेबर ड जिवनसत्व व कॅल्शीयम घेतल्याने नवीन पेशी तयार होण्यास मदत होते त्याचा परीणाम हलचाल वाढते व दुखणे कमी होते.
* प्रत्येक आजारांत उपकरण कमीत कमी ३ व अाजाराच्या कालाविधप्रमाणे जास्त वेळेस वापरावे लागते.
अश्या प्रकारे हे उपकरण फिजीओथेरपी क्षेत्रात क्रांती करणारे ठरणार आहे.

-डॉ.निखील केंद्रेकर,
फिजीओथेरपीस्ट व खांद्याचे विशेष तज्ञ,
चित्रा फिजीओथेरपी, बसस्टॅंड जवळ, परभणी.
मो:९८९०३३६५८१